जीएसटी विभागाकडून गंगापुरात एका व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त

Foto
▶ १ कोटी ८१ लाखरुपयांचा कर थकवल्याने केली कारवाई
▶ कारवाई आता गुलदस्त्यात राहणार का बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष
गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर येथील एका व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त केली आहे. संबंधित व्यापाऱ्याकडे १ कोटी ८१ लाख ६ हजार ८०० रुपयांचा कर थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जीएसटी विभागाने दिली.

जीएसटी विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापुरात एका व्यापाऱ्याच्या विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. संबंधित व्यापाऱ्याने १ कोटी ८१ लाख रुपयांचा कर थांबवला होता, अशी माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे गंगापूर शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
जीएसटी कर भरण्यास टाळाटाळ करणारे एक मोठा व्यापारी, व्यावसायिकांवर राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

वारंवार नोटिसा पाठवून देखील कर अदा न करणाऱ्या गंगापुर येथील एका व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त केली आहे. संबंधित व्यापाऱ्याकडे १ कोटी ८१ लाख ६ हजार ८०० रुपयांचा कर थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जीएसटी विभागाने दिली. मुल्यवर्धित कर कायदा तसेच वस्तु व सेवा कर कायदा अंतर्गत प्रलंबित असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. गंगापूर शहरातील व्यापारी मध्ये खळबळ झाली आहे. हे कारवाई आता गुलदस्त राहणार का बाहेर येणार याकडे सर्वांच्या लक्ष लागलेला आहे.